आग्रा येथील पत्रकार परिषदेत 2018 पासून जन आंदोलनाला सुरुवात करणार अशी घोषणा अण्णा हजारे ह्यांनी केली. माझा आंदोलनातून दुसरा केजरीवाल जन्माला येऊ नये अशी आशा व्यक्त करून दिल्ली चे मुख्य मंत्री अरविंद केजरीवाल ह्यांचा विषयी असलेली चीड त्यांनी प्रथमच जाहीर पाने व्यक्त केली.
आग्र्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अण्णा हजारे ह्यांनी भाजप आणि काँग्रेस वर सुद्धा टीका केली.२३ मार्च २०१८ पासून दिल्ली चा रामलीला मैदानावर पुन्हा त्रिसूत्री आंदोलनाला सुरवात करणार असून त्यात लोकपाल नियुक्ती निवडणूक प्रणालीत सुधारणा करण्यासाठी जनतेत जागृती निर्माण करणार असे देखील सांगितले. नरेंद्र मोदी वा काँग्रेस ह्या दोघांचे हि सरकार नकोय, शेतकऱ्यांचा हितासाठी काम करणारे सरकार हवे आहे असे हि अण्णांनी ह्या वेळेस सांगितले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews